ना ट्राफिकची कटकट, ना प्रवासाची दगदग; नव्या मेट्रोला मुंबईकरांनी दिला असा प्रतिसाद, पाहा Photos

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो लाइन 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाल्याने, आता 33.5 किमीची 'अक्वा लाइन' पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. कफ परेड ते आरेपर्यंत धावणारी ही पहिली भूमिगत मेट्रो मुंबईकरांसाठी जलद आणि सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय आहे.

Updated on: Oct 09, 2025 | 1:33 PM
1 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबई मेट्रो लाइन 3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन केले. यानंतर गुरुवार ९ ऑक्टोबरपासून 33.5 किलोमीटर लांबीची संपूर्ण मेट्रो लाइन पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे.

2 / 8
दक्षिण मुंबईतील कफ परेड ते पश्चिम उपनगरातील आरे जेवीएलआर पर्यंत धावणारी ही मुंबईतील पहिला पूर्णतः भूमिगत मेट्रो आहे. याला 'एक्वा लाइन' म्हणूनही ओळखले जाते.

3 / 8
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी दोन्ही टर्मिनल (कफ परेड आणि आरे) वरून पहिली ट्रेन ठराविक वेळेनुसार मार्गस्थ झाली.

4 / 8
यापूर्वी, ही एक्वा लाइन आचार्य अत्रे चौक आणि आरे जेवीएलआर दरम्यान अंशतः कार्यरत होती. काल पंतप्रधान मोदींनी आचार्य अत्रे चौक आणि कफ परेड दरम्यानच्या 'फेज 2बी' चे उद्घाटन केल्यामुळे, हा संपूर्ण 33.5 किमीचा कॉरिडॉर आता मुंबईकरांसाठी खुला झाला आहे.

5 / 8
दक्षिण मुंबई ते पश्चिम मुंबई अशी मेट्रो पहाटेच्या वेळी सुरु झाली असली तरी त्याला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला. अनेक प्रवाशांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधानाची भावना दिसत होती.

6 / 8
यावेळी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक वर्षांपासून या मेट्रोची प्रतीक्षा करत असलेल्या मुंबईकरांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच या नवीन सेवेचे स्वागत केले.

7 / 8
एक्वा लाइन पूर्णपणे सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे. या मेट्रोमुळे कफ परेडसारख्या दक्षिणेकडील भागांना थेट आरे आणि त्यापुढील उपनगरांशी जोडल्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.

8 / 8
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक थेट मेट्रो स्टेशनला जोडले गेले आहे. यासाठी प्रवाशांना थेट भुयारी मार्गातून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळला आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या या मेट्रो लाइनमुळे जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.