Mahakumbh 2025: श्रद्धा अन् आस्थेची डुबकी..; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गंगेत स्नान

माघ अष्टमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलंय. भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष माळ घालून मोदींनी संगमात डुबकी मारली. यावेळी त्यांनी काही मंत्रांचा जपसुद्धा केला. मोदींच्या पवित्र स्नानाचे पहिले फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Feb 05, 2025 | 11:50 AM
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजला पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं. प्रयागराजमधील संगममध्ये त्यांनी गंगा नदीची पूजा केली. मोदींच्या पवित्र स्नानाचे पहिले फोटो समोर आले आहेत.

2 / 5
भगवे वस्त्र, गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ घालून मोदींनी संगममध्ये स्नान केलं. काही मंत्रांचं पठण करत मोदींनी संगममध्ये पवित्र स्नान केलं. महाकुंभमधील या पवित्र स्नानाला अत्यंत महत्त्व आहे.

3 / 5
कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्यासारखे शुभ दिवस निवडले जातात. परंतु मोदींनी आजचा 5 फेब्रुवारीचा दिवस का निवडला, असा प्रश्न अनेकांना पडला. तर यादिवशी माघ अष्टमी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार भक्ती, दानधर्म, तपश्चर्या यांमध्ये माघ अष्टमी शुभ दिवस मानला जातो.

4 / 5
माघ अष्टमी हा माघ महिन्याच्या आठव्या दिवशी येतो. हा दिवस ध्यानसाधना, दान आणि प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अध्यात्मिक विकासासाठी हा दिवस चांगला मानला जातो.

5 / 5
13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळा सुरू आहे. आतापर्यंत तिथल्या संगमात कोट्यवधी लोकांनी पवित्र स्नान केलंय.