गौतमी पाटील नाही मी गुंजन पाटील, शिट्ट्या वाजवण्यावर भडकली कवयित्री, थेट मंचावरच..
गौतमी पाटील तूफान चर्चेत असलेले नाव आहे. त्यातच गौतमी पाटीलचा डान्स म्हणजे पाहायचे काम नाही. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिट्ट्या जोरदार असतात. मात्र, एका कवयित्रीने आठवण करून दिली की, मी गौतमी पाटील नाही तर गुंजन पाटील आहे.

शिट्ट्या वाजवताना फक्त हेच लक्षात घ्या की, मी गौतमी पाटील नाही तर गुंजन पाटील आहे... प्रसिद्ध कवयित्री मंचावर गेली आणि उपस्थितांनी थेट शिट्ट्या वाजवण्यास सुरूवात केली. हे पाहून थेट कवयित्रीने चांगलेच सुनावले.

परभणीत आयोजित एका कार्यक्रमात प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील भाषणासाठी उठल्या. यादरम्यान उपस्थितांनी त्यांना बघताच टाळ्यांपेक्षा अधिक शिट्ट्या वाजवण्यास सुरूवात केली.

यावेळी कवयित्रीने थेट म्हटले की, शिट्ट्या वाजवण्यापूर्वी हेच लक्षात ठेवा की, गौतमी पाटील नाही तर तुम्ही गुंजन पाटीलला ऐकत आहोत. ज्यानंतर काहीवेळ शिट्ट्यांचा आवाज कमी झाला.

यावेळी स्टेजवरील एकजण म्हणाले की, शिट्ट्या वाजवणे ही आपली संस्कृती नाही. यावेळी खालून जोरदार टाळ्यांचा आवाज आला. लगेचच म्हणण्यात आले की, कार्यक्रमात शिट्टी वाजवण्यास काही हरकत नाही.

परत पुन्हा शिट्ट्यांचा आवाज झाला. जोरात शिट्ट्या वाजवल्या जात होत्या. गुंजन पाटील यांनी म्हटले की, गौतमी पाटील नाही तुम्ही गुंजन पाटीलला ऐकत आहात.