
धाराशिव : साप पाहिला की सगळेच घाबरतात. कारण सापाचा दंश झाला की आपला मृत्यू होऊ शकतो, अशी भीत प्रत्येकालाच वाटते. दरम्यान, आता धाराशिवच्या महिला जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येथे धाराशिवच्या महिला रुग्णालयात साप शिरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल झाला असून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुग्णालयात अचानक साप शिरल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळाले. विशेष म्हणजे याआधी चार ते पाच वेळा या रुग्णालयात साप आढळल्याची घटना घडली आहे.

त्यामुळेही या रुग्णालयात उपचार घेण्याआधी इथे आढळणाऱ्या सापांबद्दल विचारलं जात आहे. रुग्णालयात अनेक रुग्णांवर उपचार सुरू असताना साप शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसा मण्यार जातीचा साप या रुग्णालयात शिरला होता. हा साप विषारी असतो. याच सापाचा रुग्णालय परिसरात खुला वावर पाहायला मिळतोय.

रुग्णालय परिसरात सगळीकडे घाण झाली आहे. याच घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात सापाचा वावर वाढला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.