पोलीस होण्याचे स्वप्न भंगले, तरुणाला 5 लाखांचा गंडा, तळकोकणात काय घडलं?

राजापूर तालुक्यातील मोरोशी येथील २८ वर्षीय लवेश कानडे यांच्याशी पोलीस भरतीच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. ज्ञानेश पांचाळ नावाच्या आरोपीने "आर्मी अधिकारी" असल्याचा बनाव करून त्यांच्याकडून ४ लाख ९० हजार ९०६ रुपये घेतले.

| Updated on: May 05, 2025 | 3:20 PM
1 / 7
पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने राजापूर तालुक्यातील मोरोशी येथील एका २८ वर्षीय तरुणाला तब्बल ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

2 / 7
या प्रकरणी लवेश यशवंत कानडे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ज्ञानेश वसंत पांचाळ असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

3 / 7
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश पांचाळ याने लवेश कानडे याला आपण विजय सुतार नावाच्या एका आर्मी ऑफिसरला ओळखतो. तो पोलीस भरतीसाठी मदत करू शकतो, असे आमिष दाखवले होते.

4 / 7
यानंतर डिसेंबर २०२० ते १२ ऑगस्ट २०२४ या दरम्यान पांचाळने वेळोवेळी गुगल पे द्वारे लवेशकडून एकूण ४ लाख ९० हजार ९०६ रुपये उकळले.

5 / 7
जेव्हा लवेश कानडे याने पांचाळकडे पैशांबाबत विचारणा केली, तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. आज-उद्या पैसे देतो, अशी खोटी आश्वासने देऊ लागला.

6 / 7
अखेरीस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्रस्त झालेल्या लवेश कानडे याने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्ञानेश पांचाळ विरोधात तक्रार दाखल केली.

7 / 7
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणाची अशाप्रकारे फसवणूक झाल्याने त्याचे स्वप्न भंगले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.