
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेरमधील सभेपूर्वी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं.

एकनाथ शिंदे स्टेजवर पोहोचले, कार्यकर्त्यांनी स्टेजकडे जाण्यासाठी गर्दी केल्यानं गोंधळ उडाला, त्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.

सभेसाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे, त्यामुळे सभास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान पोलिसांचे नियोजन देखील कोलमडल्याचं पाहायला मिळालं.

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये सभार पार पडली, मात्र या सभेपूर्वी जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे. कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

दरम्यान आज एकनाथ शिंदे यांची तोफ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात धडाडली, यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आपली लढाई सत्तेसाठी नाही, तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. एकही मारा लेकीन सॉलिड मारा, जोर का झटका? अजून सावरलेले की नाही? माहित नाही, अशा शब्दात थोरात यांच्यावर शिंदे यांनी टीका केली आहे.