धक्कादायक! ज्योती मल्होत्राचा पहलगाम हल्ल्यात हात? ‘त्या’ तीन दिवसांचं नेमकं कनेक्शन काय

ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पहलगाम हल्ला आणि ज्योती मल्होत्रा याचा काय संंबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे.

| Updated on: May 19, 2025 | 9:07 PM
1 / 6
पोलिसांनी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. या अटकेनंतर तिच्याबाबत अनेक खुलासे होत आहेत.

2 / 6
हिसार पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात. दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तिची भूमिका असू शकते, असा संशय हिसार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

3 / 6
मात्र चौकशीदरम्यान याबाबतचे सर्व आरोप ज्योती मल्होत्राने फेटाळले आहेत.

4 / 6
असे असले तरी पहलहामचा हल्ला आणि ज्योती मल्होत्रा हिची पहलगाम टूर लक्षात घेता पोलिसांना तसा संशय बळावला आहे.

5 / 6
मिळालेल्या माहितीनुसार पहलगाममध्ये हल्ला झाला त्याच्या तीन दिवसांआधी ज्योती मल्होत्रा ही काश्मीरमध्ये होती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या घातल्या त्या भागातही ज्योती मल्होत्रा गेली होती.

6 / 6
या सर्व कारणांमुळे पहलगाम हल्ल्यात ज्योतीने भूमिका बजावली असावी, असा संशय पोलिसांना आहे. मात्र अद्याप याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांना सापडले आहेत का? याची स्पष्ट माहिती समोर आली नाही. पोलीस ज्योती मल्होत्राची सध्या चौकशी करत आहेत. तिच्या चौकशीतून अनेक स्फोटक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.