पक्ष-चिन्ह हातून गेल्यावर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत; कार्यकर्त्यांना दिला ‘जिंकण्याचा’ कानमंत्र

Sharad Pawar Baramati home Govindbaug NCP Activists Crowd : पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यावर शरद पवार पहिल्यांदा बारामतीत... बारामतीतील 'गोविंदबाग' निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. बारामतीत नेमकं काय घडतंय? शरद पवार यांचं पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना काय आवाहन? वाचा...

आयेशा सय्यद | Updated on: Feb 17, 2024 | 10:48 AM
1 / 5
प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 17 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत. गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आलाय.

प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 17 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत. गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आलाय.

2 / 5

शरद पवार यांच्या बारामतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोविंद बागेत आले आहेत.

3 / 5

शरद पवार यांच्या उपस्थितीत काही पक्ष प्रवेश झाले. माळशिरसमधील काही कार्यकर्ते शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी काहीही झालं तरी आपण पवारांना सोडणार नाही, असं हे कार्यकर्ते म्हणत होते.

4 / 5

राजकारणात पक्ष उभे राहतात. काही लोक पक्ष सोडून जातात. नवे लोक पक्षात येतात. ही राजकारणाची रीत आहे. पण सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे ते योग्य नाही. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. लोकांना विश्वास धीर द्या यश नक्की मिळेल, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

5 / 5

पण देशात पहिल्यांदा अस घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतला. हा निर्णय कायद्याला धरून आहे, असं वाटत नाही. म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच लागेल, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us