AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दडपशाही नव्हे, संवाद हवा; विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात

anna hazare : अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उडी घेतली आहे. ते आज गुरुवारी मौन आंदोलन करत आहे.

दडपशाही नव्हे, संवाद हवा; विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात
| Updated on: Jul 23, 2026 | 1:55 PM
Share

नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर 20 जुलै रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला. एकीकडे दिल्लीत सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातही अण्णा हजारेंनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, असा संदेश अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे.

अण्णा हजारे यांचं आंदोलन चर्चेत

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांनी सकाळी अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाआधी त्यांनी सरकारकडून दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, अशी भूमिका बॅनरच्या मार्फत स्पष्ट केली. सरकारने संवाद साधून प्रश्न सोडवायला हवेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असं आवाहन देखील केलं. यावेळी आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरुपात ‘नगरचे जंतर-मंतर’ नाव दिल्याचे जाहीर केले. अण्णा हजारे यांचं मौन आंदोलन चर्चेत आलं आहे.

विद्यार्थ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात 

अण्णा हजारे यांनी आंदोलनाला सुरुवात करण्याआधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे यांच्या डोळ्यात अश्रू देखील आले. अण्णा हजारे यांनी आंदोलनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं. अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सरकारच्या दडपशाहीविषयी चिंता व्यक्त केली. अण्णा हजारे यांनी म्हटलं की, ‘ नीट पेपरफुटी , बेरोजगारी, भरती प्रक्रियांवरून चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हे. तर लोकभावनेचा विषय म्हणून पाहिले पाहिजे. सरकारने विद्यार्थी आणि आंदोलकांशी संवाद करावा, असं म्हणत त्यांनी लोकशाही मूल्याची आठवण करून दिली’.  अण्णा हजारे यांच्या आंदोलकाकडे विरोधकांसहित विरोधकांचंही लक्ष असणार आहे.

Follow Us
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट