
काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेत असल्याचं दिसत आहे. नुकतंच त्यानी दिल्लीच्या करोलबाग मार्केटला भेट दिली. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

या भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी मॅकेनिक्सकडून काही धडे घेतले. तसेच स्वत: काम करत अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. स्क्रू ड्रायवर हातात घेऊ काम केलं.

गॅरेजमध्ये असलेल्या मशिनबाबत त्यांनी माहिती घेतली आणि मॅकेनिक्ससोबत चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

काँग्रेसने फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "हे हात भारत घडवतात, या कपड्यांवरील मळ हा आपला अभिमान आणि अभिमान आहे. अशा हातांना प्रोत्साहन देण्याचे काम लोकनेतेच करतात. "

काँग्रेस 2024 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी करत आहे. राहुल गांधी यांनी नुकतीच पाटण्यामध्ये विरोधकांच्या बैठकीत हजेरी लावली होती.