
धाराशिव : धाराशिवमध्ये शिवसेनेचे राज्य समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीत राडा झाला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बॅनरवरून फोटो हटवल्यानंतर नाराज झालेल्या सावंत समर्थकांनी साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

तानाजी सावंत जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचा बॅनरवर का फोटो नाही? असा सवाल करत कार्यकर्त्यांनी साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली.

साळवी यांच्यासमोर जवळपास अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. भूम परंडा मतदारसंघातील सावंत समर्थक बैठक सोडून अर्ध्यातूनच निघून गेले. राजन साळवी यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

राजन साळवी यांनी मात्र या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बैठकीत गोंधळ झालाच नाही. तानाजी सावंत शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांचा बॅनरवर फोटो होता,राजन साळवी म्हटलंय.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांनी आज धाराशिवमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यावेळी हा प्रसंग घडला.