मुंबईतील प्रदुषण रोखायचं असेल तर…; वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडमध्ये…
CM Eknath Shinde on Mumbai Road Cleaning Reviewed : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील स्वच्छतेची पाहणी केली. यासाठी त्यांनी भल्या पहाटे मुंबईतील रस्त्यांवर जात आढावा घेतला. वाढत्या प्रदूषणावरही त्यांनी उपाय काढला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? पाहा...

रस्त्यांची सफाई करावी, धूळ साफ करावी. रस्ते पाण्याने धुवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. सकशन मशीन धूळ शोषून घेते. एक हजार वॉटर टँकर सुद्धा आपण घेणार आहोत. स्प्रिंकलर लावायच्या आहेत.यामुळे प्रदूषण आणि तापमान कमी होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे मुंबईतील रस्त्यांच्या स्वच्छतेची पाहणी केली. त्यांनी शहरातील स्वच्छेतेचा आढावा घेतला.
- मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसरात आज पहाटे त्यांनी भेट दिली.
- वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची आवश्यता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुंबईत प्रदूषण वाढतंय. स्वच्छत आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
- रस्त्यांची सफाई करावी, धूळ साफ करावी. रस्ते पाण्याने धुवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. सकशन मशीन धूळ शोषून घेते. एक हजार वॉटर टँकर सुद्धा आपण घेणार आहोत. स्प्रिंकलर लावायच्या आहेत.यामुळे प्रदूषण आणि तापमान कमी होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
- प्रदूषणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे हे उपस्थित होते.
- स्वच्छता कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. अनेक ठिकाणी विकासकामे सुरु आहेत. ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याची योजना आहे. स्वच्छता ही लोकचळवळ व्हायला हवी, त्यासाठी सर्वांची मदत हवीय. अख्खी मुंबई स्वच्छ करायची आहे. सार्वजनिक प्रसाधनगृह पण दररोज स्वच्छ केली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी केल्या.
Non Stop LIVE Update