
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात बालकांचे आरोग्य निदान शिबीर कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.

मात्र या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली दिसून आली. शिबिरात लहान लहान मुलं असताना ही अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हता तर सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता.

खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या कार्यक्रमातच जर असा नियमांचा भंग होत असेल तर मग इतरांच काय ? असा सवाल यावेळी उपस्थित होतोय.

मात्र यावर भारती पवार यांना विचारलं असता त्यांनी कोरोना नियम पाळण्याचं नागरिकांनाच आवाहन केलं