राष्ट्रवादीकडून कोकणासह 6 जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार, 135 पेक्षा जास्त आरोग्य शिबिरं
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून कोकणासह 6 जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 135 पेक्षा जास्त आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीरे घेण्यात आले.
-
-
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या माध्यमातून कोकणासह 6 जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 135 पेक्षा जास्त आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीरे घेण्यात आले. याबाबत राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी माहिती दिली.
-
-
महाराष्ट्रातील कोकणासह एकूण 6 जिल्हयात पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
-
-
अनेक गावांचा संपर्क तुटला. काही दिवस काही भाग पाण्याखाली राहिल्याने वित्त व जिवितहानी झाली.
-
-
पूराचे पाणी घरात व परिसरात बराच काळ राहिल्यामुळे रोगराईचा मोठा धोका निर्माण होणार असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने मदतीचा हात पुढे केला.
-
-
तसेच पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत पोचविण्याच्या सूचना डॉक्टर सेलला केल्या.
-
-
यानुसार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने डॉक्टरांच्या मदतीसाठी 10 रुग्णवाहिका व डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करुन दिली.
-
-
केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मुबलक व सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती.
-
-
डॉक्टर सेलच्या 200 डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात खोकला, ताप, सर्दी, उलटी, संडास, बचाव कार्यात झालेल्या छोट्या-मोठ्या जखमा, लेप्टोस्पायरॉसिस, पायांना बुरशी आदी आजारांवर उपचार केले.
-
-
काही गावात रस्ता वाहून गेल्यामुळे औषधांचे साहित्य डोक्यावर घेत डॉक्टरांनी बाधित लोकांची सेवा केली.
-
-
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सर्व जिल्हयातील पूरग्रस्त भागात आरोग्य शिबीरे घेतली तर सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्हयातील काही भागात अजून शिबीरे घेण्यात येणार आहेत.
-
-
राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल नैसर्गिक आपत्ती किंवा महामारीमध्ये जनतेला वैद्यकीय मदत करत आला आहे.
-
-
यापूर्वी 2019 चा पश्चिम महाराष्ट्रातील पूरावेळीही आणि कोरोना महामारीत, मराठवाड्यातील दुष्काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक समुपदेशन आदी कामं राष्ट्रवादी डॉक्टर सेलने केलीत.