
देशात लोकसभा निवडणूक होतेय. या निवडणुकीचा निकाल लागलाय. आता उद्या एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एका तरूण खासदाराची जोरदार चर्चा होतेय.

हे आहेत, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान... चिराग यांची मागच्या काही दिवसात सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. त्यांच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

चिराग पासवान यांनी बिहारमधील हाजीपूर या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तिथं ते जिंकले सुद्धा आहेत. लोकजनशक्ती पार्टीचे दिवंगत नेते राम विलास पासवान यांचे ते सुपुत्र आहेत.

चिराग यांनी याआधी सिनेमा क्षेत्रात काम केलंय. 'मिले ना मिले हम' या सिनेमात त्यांनी कंगना रनौतसोबत काम केलंय. 2011 ला त्यांनी हा पहिला सिनेमा केला. मात्र त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडला रामराम करत त्यांनी राजरकीय जीवनात प्रवेश केला. चिराग पासवान त्यांच्या राजकीय करिअरसोबतच त्यांच्या लूकमुळे सध्या चर्चेत आहेत. चिराग खूपच हँडसम दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.