Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधी यांनी समस्त महिलांची जाहीर माफी मागावी!; चित्रा वाघ आक्रमक

Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसचा मुद्दा चर्चेत, भाजप आक्रमक... चित्रा वाघ यांच्यासह भाजपची महिला आघाडी रस्त्यावर उतरली. राहुल गांधी यांच्या माफीची मागणी यावेळी करण्यात आली.

| Updated on: Aug 10, 2023 | 4:08 PM
1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर काल संसदेत जोरदार भाषण केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या एका कृतीवर भाजपने आक्षेप घेतला.

2 / 5
राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचं भाजपने म्हटलं. शिवाय एका खासदाराला हे वर्तन शोभणारं नाही, असं म्हणत भाजपने तीव्र निषेध नोंदवला.

3 / 5
मुंबईत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरल्या होत्या. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

4 / 5
राहुल गांधींनी फ्लाईंग किस करून संसदेची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला. महिलांचं विनयभंग होईल अशीच ही कृती होती.आमची मागणी आहे की, राहुल गांधींनी समस्त महिलांची जाहीर माफी मागावी!, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

5 / 5
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी संसदेत प्रवेश करताना पायरीवर माथा टेकवतात आणि कांग्रेसचे युवराज संसदेत मणिपूर मधील महिलांच्या संवेदनशील मुद्द्यांवर बोलताना फ्लाईंग किस करतात. हा फरक आहे भारत आणि इटलीमधला, असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला.