
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केलं.

संसदेचं कामकाज आणि भारतीय लोकशाहीचं सौंदर्य यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

या भेटीवेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे हेदेखील उपस्थित होते.