वरळीतील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मुलाची महापौर पेडणेकरांकडून प्रत्यक्ष भेट घेत आस्थेनं विचारपूस

| Updated on: Feb 19, 2022 | 4:50 PM

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांनी यावेळी प्रत्यक्ष भेटून सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मुलाची आस्थेने विचारपूस केली. त्याच्या नातेवाईकांकडून इतर बाबीही समजून घेतल्या.

1 / 5
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज कस्तुरबा रुग्णालयात जाऊन एका बाळाची भेट घेतली. हे बाळ सिलिंडर स्फोटात गंभीर जखमी झालं होतं.

2 / 5
कस्तुरबा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद याने घेतलेल्या या मेहनतीला यश येऊन हे बाळ सुखरूप पणे लवकरच त्याचे आजोबा व मामा यांच्यासह घरी परतेल, असा विश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी सर्वांचे आभारही मानलेत.

3 / 5
या भेटीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाशी संवाद साधत चर्चाही केली.

4 / 5
वरळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार महापौर या नात्याने पेडणेकर यांनी वरळी येथील घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या लहान मुलाची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी संबंधित कस्तुरबा रुग्णालयातील अधिष्ठाता चंद्रकांत पवार, मुंबई शहराचे उपमहापौर श्री सुहास वाडकर हे देखील सोबत होते.

5 / 5
किशोरी पेडणेकर यांनी यावेळी प्रत्यक्ष भेटून सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या मुलाची आस्थेने विचारपूस केली. त्याच्या नातेवाईकांकडून इतर बाबीही समजून घेतल्या. मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद याने घेतलेल्या या मेहनतीला यश येऊन हे बाळ सुखरूप पणे लवकरच त्याचे आजोबा व मामा यांच्यासह आता लवकरच घरी परतणार आहे.