
'स्वच्छता हीच सेवा अभियान' अंतर्गत 'गड किल्ले स्वच्छता अभियानाचं' उदघाटन झालं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते.

शिवडी किल्ल्यावर आज स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा कालिदास कोळंबकर यांच्यासह अन्य नेतेही उपस्थित होते.

हातात झाडू घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवडी किल्ल्यावर स्वच्छता मोहिम केली. यावेळी तरूणाई त्यांच्यासोबत सहभागी झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाच्या निमित्ताने 350 किल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहिम कौशल्य विकास विभागाने हाती घेतली आहे. स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. यात आयटीआयच्या विद्यार्थ्यीही सहभागी झाले आहेत, असं यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गडकिल्ले स्वच्छ झाले पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे. त्यासाठी हा स्वच्छता उपक्रम आम्ही राबवत आहोत. या अभियानातून अनेक गडकिल्ले स्वच्छ होतील, असंही फडणवीस म्हणाले.