
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी... पण कुटुंबाच्या बाबतीत मात्र ते प्रचंड हळवे आणि तितकेच खमके आहेत. प्रतिभा आणि शरद पवार यांचं अरेंज मॅरेज आहे.

1 ऑगस्ट 1967 साली प्रतिभा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या वर्षी त्यांच्या लग्नाला 57 वर्षे पूर्ण होतायेत. पण आज इतक्या वर्षांनंतर या दोघांच्या नातातील काही गोष्टी आजही बदललेल्या नाहीत.

यातलीच एक गोष्ट म्हणजे आजही शरद पवार हे प्रतिभा पवार यांच्यासाठी साडी खरेदी करतात. प्रतिभा पवार नेसत असलेली प्रत्येक साडी ही पवारांच्या पसंतीची असते.

शरद पवार जर कुठे दौऱ्यासाठी गेले. तरी ते आवर्जून तिथल्या स्थानिक दुकानात जात साडी खरेदी करतात. आज 57 वर्षांनंतरही या दोघांच्या नात्यातील ही गोष्ट बदललेली नाही.

प्रतिभा पवार या सावलीसारखं शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवारांचा संघर्षाचा काळ, त्यांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी प्रतिभा पवार त्यांच्या पाठीशी असतात. प्रतिभा- शरद पवार आणि त्यांची लेक सुप्रिया यांचा हा एक जुना फोटो...