
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरु आहे. हा वाद सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बेळगावात गेले आहेत.

बेळगावमधील मराठी बांधवांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेत त्यांची चौकशी केली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर रोहित पवार यांनी दीपक दळवी यांच्याशी चर्चा केली.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचं बदलतं रूप आणि पर्याय याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली.