
राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रा करत आहेत. या यात्रेअंतर्गत ते स्थानिकांशी भेटीगाठी करत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

रोहित पवार यांनी परभणीच्या येलदरी धरणात सूर मारला. तसंच पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्याचा हा फोटो...

परभणीत रोहित पवार यांनी ट्रॅक्टर चालवला. पाऊस आला तरी आता आम्ही थांबणार नाही, म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केलाय.

युवा संघर्ष यात्रेदरम्यान परभणीतल्या जिंतूरमधल्या रुद्र कदम या चिमुकल्याने रोहित पवार यांची भेट घेतली. दिवाळीच्या सुट्टीत रुद्रने पोहित पवार यांचं चित्र रेखाटलं. हे चित्र या चिमुकल्याने रोहित पवार यांना भेट दिलं.

रोहित पवार यांनी या युवा संघर्ष यात्रेतून तरूणांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत आहेत. अशात क्रिकेट खेळणाऱ्या तरूणांसोबत रोहित पवार यांनी क्रिकेटचा आनंद घेतला.