PHOTOS : राम मंदिर जमीन घोटाळ्यावरुन सेना भवनासमोर राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी

अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत राडा झाल्याचं पाहायला मिळालंय.

| Updated on: Jun 16, 2021 | 4:18 PM
अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत राडा झाल्याचं पाहायला मिळालंय.

अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत राडा झाल्याचं पाहायला मिळालंय.

1 / 9
शिवसेनेने या मुद्द्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाने त्याचा निषेध करत दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला. यावेळी शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमले.

2 / 9
त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना सेना भवनापासून 5 किलोमीटर अंतरावरच अडवलं. याशिवाय सेना भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोर्चकऱ्यांची धरपकडही करण्यात आली.

3 / 9
त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडले. यामुळे सेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.

4 / 9
राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून युवा मोर्चाने आंदोलन पुकारले होते. भाजपच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवना समोर जमले.

5 / 9
जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्यानेच शिवसैनिक सेना भवनासमोर जमले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात मोठी धुमश्चक्री उडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे सेना भवनासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सेना भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवांनाही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.

6 / 9
त्यानंतर दुपारी भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजाराणी चौकात आले. यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले.

7 / 9
दरम्यान, पोलिसांची व्हॅन या आंदोलकांना घेऊन शिवाजी पार्ककडे निघाली. तेव्हा व्हॅन येताच काही शिवसैनिक व्हॅनच्या दिशेने धावले. आंदोलकांना पकडण्यासाठी शिवसैनिक धावले होते. मात्र, व्हॅन सुसाट गेल्याने भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हाती लागले नाहीत.

8 / 9
मोर्चा संपला असं वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.