
राजधानी दिल्लीत आज G-20 परिषद होत आहे. या परिषदेसाठी जगभरातील महत्वाचे नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत आहेत.

G-20 परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील आले आहेत. त्यांचीही पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांच्यासोबतच्या भेटीचे क्षण सोशल मीडियावर शेअर केलेत. या भेटीतील चर्चेचे मुद्देही त्यांनी मांडले.

ऋषी सुनक यांना भेटून आनंद झाला. या दोन देशातील व्यापार आणि गुंतवणुकीला कशी चालना देता येईल, यावर या आम्ही चर्चा केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, आज सकाळी भारतमंडपमध्ये येताना मोदी आणि ऋषी सुनक यांच्या गळाभेटीची जोरदार चर्चा झाली. ही गळाभेट ब्रिटन-भारत संबंधांचं द्योतक असल्याचं बोललं गेलं.