AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई हादरली! हायड्रोजन गॅसच्या फुग्यांच्या स्फोटात 3 जण भाजले, अंगावर काटा आणणारा Video समोर

Hydrogen Balloon Blast : गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण भाजले आहे.

मुंबई हादरली! हायड्रोजन गॅसच्या फुग्यांच्या स्फोटात 3 जण भाजले, अंगावर काटा आणणारा Video समोर
Baloon BlastImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 04, 2026 | 7:11 PM
Share

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 जण भाजले आहे. अंगावर शहारे आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेतील जखमींमध्ये दोन तरूण आणि एका तरूणीचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हायड्रोजनच्या फुग्यांचा स्फोट

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे 2 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम भागात अनमोल टॉवर नावाची इमारत आहे. या इमारतीत वाढदिवसाची पार्टी होती. त्यामुळे सजावटीचं काम सुरू होतं. लिफ्टमधून एक महिला जात होती. त्यावेळी सजावट करणारा एक तरुण हायड्रोजनने भरलेले फुगे घेऊन जाण्यासाठी लिफ्टमध्ये आला. लिफ्टमध्ये आल्यानंतर अवघ्या काही सेकंदात अचानक फुग्यांचा भीषण असा स्फोट झाला.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

हा स्फोट इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळाने लिफ्ट व्यापून गेली होती. सुदैवाने लिफ्टचं दार बंद झालं नव्हतं, त्यामुळे लिफ्टमधील तिघा जणांनी बाहेर पळ काढला. हा सगळा प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने वेळीच लिफ्टमधील तिघेजण बाहेर पडले. पण, या आगीत तिघेही होरपळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही.

हायड्रोजनच्या फुग्यांचा स्फोट का होतो?

हायड्रोजन फुग्यांचा स्फोट होण्याचे मुख्य कारण म्हणजे हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे, जो हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर उष्णता किंवा ठिणगीमुळे त्वरित पेट घेतो. यानंतर लगेच मोठा स्फोट होतो. हायड्रोजन वायू पेटण्यासाठी खूप कमी उर्जेची आवश्यकता असते. फुगा फुटल्यावर त्यातील हायड्रोजन हवेतील ऑक्सिजनशी त्वरित मिसळतो आणि एक स्फोटक मिश्रण तयार होते, ज्यामुळे मोठा धमाका होतो. मेणबत्ती, सिगारेटची ठिणगी किंवा अगदी घर्षणामुळे होणारी छोटी ठिणगी हायड्रोजनला पेटवण्यासाठी पुरेशी असते. त्यामुळे हे फुगे अत्यंत सावधपणे हाताळणे गरजेचे आहे.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश