
खासदार सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती सुळे हिच्यासोबत साडी खरेदी केली. सुप्रिया सुळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

पुण्यात सध्या भिमथडी जत्रा सुरु आहे. या भिमथडी जत्रेत सुप्रिया सुळे या सह कुटुंब गेल्या होत्या. यावेळी त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या. यावेळी लेक रेवती सुप्रिया सुळे यांच्यासोबत होती.

महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या भीमथडी जत्रेस आज भेट दिली. सुनंदावहिनी पवार गेल्या 17 वर्षांहून अधिक काळ भीमथडी जत्रेचे अत्यंत यशस्वीपणे आयोजन करत आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हे काही खास फोटो शेअर केलेत.

भिमथडी जत्रेत विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल लागतात. या स्टॉलला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. लाकडी भांड्यांच्या दुकानात सुप्रिया सुळे यांनी काही वस्तू खरेदी केल्या. त्याचा हा फोटो...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भिमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी भिमथडीतील विविध दुकानांना शरद पवार यांनी भेट दिली. तेव्हा सुप्रिया सुळे यादेखील त्यांच्यासोबत होत्या.