काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. या दरम्यान राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान बुलेटही चालवली.
बॉक्सर विजेंदर सिंह यानेही भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधी आणि विजेंदर यांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
भारत जोडो यात्रा ज्या भागातून जातेय त्या भागातील संस्कृती राहुल गांधी आपलीशी करत आहेत. त्याचाच एक फोटो...
भारत जोडो यात्रेतील हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात राहुल गांधी व्हीलचेअरवर असलेल्या व्यक्तीसोबत चालताना दिसत आहेत.