तुमची लॉटरी पक्की! पैसे दुप्पट होणारच…; पोस्ट ऑफिसची मनी डबल योजना माहिती आहे का?

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेत आता तुमचे पैसे फक्त ११५ महिन्यांत दुप्पट होणार. ७.५% व्याजदर आणि सरकारी सुरक्षिततेसह या योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचा.

| Updated on: Apr 21, 2026 | 3:20 PM
1 / 8
आजच्या काळात सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणूकदारांची पहिली पसंती मिळत आहे. शेअर बाजारातील चढ-उतार आणि जोखमीपासून दूर राहू इच्छिणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची 'किसान विकास पत्र' (KVP) ही योजना सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

2 / 8
ज्यांना आपले पैसे ठराविक काळात दुप्पट करायचे आहेत, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर मानली जात आहे. किसान विकास पत्र ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक छोटी बचत योजना आहे.

3 / 8
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणुकीची पूर्ण सुरक्षितता असते, कारण सरकार स्वतः या परताव्याची हमी देते. सध्याच्या नियमांनुसार, या योजनेत गुंतवलेली रक्कम ११५ महिन्यांत (९ वर्षे आणि ७ महिने) दुप्पट होऊन मिळते.

4 / 8
केंद्र सरकार सध्या या योजनेवर ७.५ टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. हे व्याज चक्रवाढ पद्धतीने (Compounding) मोजले जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. यात तुम्ही फक्त १ हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

5 / 8
गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कितीही मोठी रक्कम गुंतवू शकता. समजा, तुम्ही या योजनेत ५ लाख एक रकमी गुंतवले, तर ७.५  टक्के व्याजासह चक्रवाढ पद्धतीमुळे दरवर्षी तुमच्या मुद्दलात व्याजाची भर पडत जाते. ११५ महिने पूर्ण होताच, तुम्हाला परिपक्वता (Maturity) म्हणून थेट १० लाख मिळतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही ७ लाख गुंतवले, तर तुम्हाला १४ लाख मिळतील.

6 / 8
एक व्यक्ती कितीही किसान विकास पत्र खाती उघडू शकते. यावर कोणतेही बंधन नाही. तुम्ही स्वतःच्या नावाने किंवा जोडीदारासोबत मिळून संयुक्त खाते उघडू शकता. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही हे खाते उघडण्याची सोय उपलब्ध आहे. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहज ट्रान्सफर करता येते.

7 / 8
जर तुम्ही भविष्यातील गरजांसाठी जसे की मुलांचे शिक्षण, लग्न किंवा सेवानिवृत्तीसाठी एक सुरक्षित आणि जोखीममुक्त पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही मनी डबल योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

8 / 8
डिस्क्लेमर: ही माहिती केवळ शैक्षणिक हेतूने दिली आहे. सरकारी योजनांचे व्याजदर आणि नियम वेळोवेळी बदलू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत माहितीची खातरजमा करा आणि आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Follow Us