मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, पोस्ट बँकेत भरती सुरू, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
Post Office Recruitment 2024 : केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. बंपर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस उमेदवाराकडे शिल्लक आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

सरकारी नोकरी आणि तिही केंद्र शासनाची नोकरी मिळवण्याची आज शेवटची संधी आहे. पोस्ट ऑफिसकडून मेगा भरती राबवली जातंय. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नक्कीच शेवटची संधी आहे, लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी ippbonline.com या साईटवर जा आणि अर्ज करा. या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला तिथेच मिळेल.

या भरती प्रक्रियेतून 47 पदे ही भरली जाणार आहेत. 21 ते 35 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात, ही मोठी संधी आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा या भरतीसाठी होणार नाहीये, मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे.