या सरकारी योजनेत गुंतवणूक करा, दर महिन्याला 61000 रुपये कमवा !
तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या एका सरकारी योजनेची माहिती आहे काय? या योजनेत निवृत्तीनंतर दर महिन्याला सुमारे 61,000 रुपये कमवता येतात. तेही कोणत्याही रिस्क शिवाय. पोस्टाची ही अशी योजना आहे जी सुरक्षित तर आहेच शिवाय टॅक्समध्ये देखील सुट देते. चला तर या योजनेची माहिती घेऊया...
-
-
पब्लिक प्रोव्हीडन्ट फंड (PPF) पोस्ट ऑफीसची अशी सरकारी योजना आहे ज्यात सरकार दरवर्षी 7.1% व्याज देते. या योजनेची खास बाब म्हणजे यात तुमचा पैसा सुरक्षित रहातो आणि टॅक्समध्येही 1.5 लाख रुपयांपर्यंत सुट मिळते.
-
-
जर तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपये PPF मध्ये 25 वर्षे लावाल तर यामुळे 15+5+5 वर्षांच्या रणनीतीने वाढून ही रक्कम वाढून 1.03 कोटी रुपयांपर्यंत पोहचू शकते. म्हणजे एक सर्वसाधारण सेव्हींगमुळे तुम्ही हळूहळू करोडपती बनू शकता. तेही कोणत्याही शेअरबाजार रिस्कशिवाय..
-
-
जेव्हा तुमचा फंड 1.03 कोटी रुपयांचा होईल, तेव्हा यातून मिळणारे व्याज वार्षिक 7.31 लाख रुपये होईल, याचा अर्थ तुम्हाला महिन्याला जवळपास 61,000 रुपयांचे व्याज मिळेल.म्हणजे निवृत्तीनंतरही तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहील.
-
-
PPF चा सर्वात मोठा फायदा हा आहे की यात मिळणारे व्याज आणि पैसे काढणे दोन्ही पूर्णपणे करमुक्त आहे.तसेच ही एक सरकारी गॅरंटीड योजना आहे.त्यात तुमचा पैसा संपूर्णपणे सुरक्षित राहतो. मग भले शेअरबाजारात किती चढ उतार होवो.
-
-
या योजनेत तुम्ही केवळ 500 रुपयांत अकाऊंट उघडू शकता. आणि अल्पवयीन मुलांच्या नावे देखील गुंतवणूक शक्य आहे. म्हणजे ही योजना तुमच्या निवृत्तीसाठीच नव्हे तर मुलांच्या भविष्यासाठी देखील चांगला पर्याय आहे. आणि हळूहळू केलेली बचत एक दिवस मोठ्या कमाईत परिवर्तित होऊ शकते.