Prajakta Gaikwad: कपाळी चंद्रकोर, केसात गजरा अन् नऊवारी साडी; प्राजक्ता गायकवाडच्या लग्नातील Inside फोटो

Prajakta Gaikwad Marriage: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील खास फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

Updated on: Dec 02, 2025 | 6:16 PM
1 / 5
छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ता गायकवाडने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आज 2 डिसेंबर रोजी ती लग्नबंधनात अडकली आहे. तिचा लग्नातील लूक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
प्राजक्ताने तिच्या लग्नातील खास क्षण अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता पती शंभुराज यांच्यासोबत दिसत आहे. दोघांनीही पारंपरिक लूक केला आहे. नव वधूच्या रुपातील प्राजक्ताच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

3 / 5
प्राजक्ताने लग्नात हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. त्यावर हातात हिरवा चु़डा, गळ्यात ज्वेलरी, केसात गजरा, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ असा सिंपल लूक केला आहे. प्राजक्ता या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

4 / 5
तर प्राजक्ताचा नवरा शंभुराज यांनी ऑफव्हॉइट रंगाची पेशवाई ड्रेस घातला आहे. त्यावर गळ्यात वाघ नखं, कपाळी चंद्रकोर, हातात तलवार असा असा मराठमोळा लूक केला आहे. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा लूक पाहण्यासारखा आहे. त्यांचा हा लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे.

5 / 5
प्राजक्ताने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पडला आहे. यापूर्वी तिच्या मेहंदी, संगीत आणि हळदी समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची उत्सुकता पाहायला मिळाली होती.