
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. प्राजक्ताविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण कायमच आतुर असतात. नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्या सोबत अभिनेता गश्मीर महाजनी दिसत आहे. दोघांनी एकत्र येत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घ्या..

प्राजक्ता आणि गश्मीर ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या जोडीवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. आता प्राजक्ता आणि गश्मीरने एकत्र येत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक गूडन्यूज दिली आहे. नेमकी ही गूड न्यूज काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्राजक्ता आणि गश्मीर यांनी सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट करून घोषणा केली. त्यांनी एकत्र काम केलेला फुलवंती सिनेमा आता हिंदीमध्ये पाहाता येणार आहे. विशेष बाब म्हणजे, हिंदी डबिंग त्यांनी स्वतःच केलं आहे. त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना प्राजक्ता आणि गश्मीर यांच्याच मूळ आवाजात हा चित्रपट अनुभवता येणार आहे. चित्रपटातील गाणीही हिंदीत डब करण्यात आली आहेत.

व्हिडीओमध्ये गश्मीर बोलताना दिसत आहे, “मराठी चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आम्ही 'फुलवंती'चं हिंदी डबिंग केलं आहे.” या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी प्रेक्षकही उत्साहित आहेत.

'फुलवंती' चित्रपटाचे हिंदी डब व्हर्जन आता फक्त Amazon Prime Video वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसंच या दोघांनी एक मोठा इशाराही दिला – ते लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत! मात्र तो प्रोजेक्ट नेमका काय आहे, याबद्दल सस्पेन्स कायम ठेवलं आहे.