
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचे 'रानबाजार' या वेबॅसिरीजमुळे सद्या चर्चेत आहे. प्लॅनेटमराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती या मराठीतील पहिल्या बोल्ड सीरिजने धुमाकूळ घातला आहे.

या वेब सिरीजबरोबरच , चंद्रमुखीमध्येही प्राजक्ता दिसून आली होती. या सगळ्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळकाढून ती आता सोलो ट्रीपवर गेली आहे.

तिने आपल्या पोस्टमध्ये My first official solo trip… ? देवभूमी- हिमाचल प्रदेश.. (हिम+आंचल) - मनाली?. हास्यजत्रेला मिळालेल्या सूट्टीचा यथायोग्य वापर ?.काळजी नसावी- जत्रेत लवकरच परत येऊ. आणि माझीही काळजी नसावी, मी काळजी घेतेय.. असे म्हणत तिने आपल्या सोलो ट्रीपची माहिती दिली आहे.

या बरोबरच तिने Much needed time असे ही म्हटले आहे. तिने तिच्या सोलो ट्रिपचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ताने शेअर केलेल्या सोलो ट्रीपच्या या पोस्टवर नेटिझन्सनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. एवढंच नव्हे तर लव्ह , हार्टच्या इमोजी पोस्ट करता लाईकही केले आहे.

या बरोबरच तिने Much needed time असे ही म्हटले आहे. तिने तिच्या सोलो ट्रिपचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.