Prajakta Mali: 22 वर्षांनंतर झाली भेट… प्राजक्ता माळीची पोस्ट व्हायरल, कोणाबद्दल बोलली?
Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण कायमच आतुर असतात. नुकताचट प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. प्राजक्ता माळी तिच्या चित्रपटांसोबतच नेहमी खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. नुकताच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमध्ये नुकताच सोनाली बेंद्रेने हजेरी लावली. त्यानंतर प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने दोन फोटो शेअर केले आहेत. हे दोन्ही फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
एका फोटोवर प्राजक्ताने तेव्हा आणि आता... क्या मस्ती क्या धूम या रिअॅलिटी शोच्या मंचावरचा फोटो असे कॅप्शन दिले आहे. प्राजक्ताचा हा फोटो 2004 सालचा आहे.
तर दुसरा फोटो22 वर्षांनंतर 2026मधील आहे. हा फोटो महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरचा आहे. तिच्याच समोर तिच्याच गाण्यावर डान्स करण्याची संधी मिळाली या आशयाचे कॅप्शन दिले आहे.