19 वर्षांपूर्वींचं गाणं, ऐकताच मनाला मिळतो सुकून, दोन दशकांनंतरही क्रेझ कायम
19 वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारं गाणं, जे ऐकताच मनाला मिळतो सुकून. ज्याच्या प्रत्येक शब्दात आहे प्रेमाची भावना. आजही लाखो लोक ऐकतात.

बॉलिवूडमधील प्रेमगीतांना नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, नवीन गायक आणि संगीतकार आले, तरी काही गाणी अशी असतात जी पिढ्यान् पिढ्या श्रोत्यांच्या मनात घर करून राहतात.

अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘बोल ना हल्के हल्के’. सुमारे 19 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. शांत, रोमँटिक असलेले हे गाणं आजही श्रोत्यांना तितकाच आनंद आणि समाधान देते.

‘बोल ना हल्के हल्के’ हे गाणे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायले आहे. दोघांच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच आध्यात्मिक झळाळी प्राप्त झाली आहे.

हे लोकप्रिय गाणं प्रीती झिंटा आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्यामधील दोघांची साधी, नैसर्गिक आणि हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला भावते.

प्रदर्शनानंतर ‘बोल ना हल्के हल्के’ने श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. कालांतराने अनेक नवीन गाणी आली, संगीताचे ट्रेंड बदलले, मात्र या गाण्याची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. आजही हे गीत प्रेम, आठवणी आणि भावनांचा अनुभव देणाऱ्या सर्वोत्तम रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाते.