Premanand Maharaj : खोटं बोलून ऑफिसला दांडी मारणं कितपत योग्य? खरं प्रेम तरी काय? प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

Premanand Maharaj Famous Quotes : वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांचे प्रवचन अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. या प्रवचनातून जीवन कसे जगावे आणि चिंता मुक्त कसे रहावे यासह अनेक विषयांवर ते मार्गदर्शन करतात.

| Updated on: Oct 21, 2025 | 5:34 PM
1 / 6
वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांचे प्रवचन अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. या प्रवचनातून जीवन कसे जगावे आणि चिंता मुक्त कसे रहावे यासह अनेक विषयांवर त्यांचे विचार प्रेरणा देतात. त्यांचा जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

2 / 6
खोटं बोलून कार्यालयातून सुट्टी घेणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कलयुग आहे, तेच मनुष्याला खोटं बोलण्यासाठी प्रेरित करत आहे. पण खोटं बोलण योग्य नाही. मग अडचणीचा सामना करावा लागला तरी हरकत नाही. पण सत्याचा मार्ग सोडू नका असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

3 / 6
जीवनात विजय कसा मिळवावा, असा एक प्रश्न विचारल्या गेला. छोट्या छोट्या चिंतेत नाहक वेळ व्यर्थ न करण्याचे प्रेमानंद महाराज म्हणतात. विजयाची चटक योग्य नाही. आता पराभव झाला तर पुढे विजय निश्चित आहे, असे प्रेमानंद महाराज म्हणतात.

4 / 6
यशस्वी होण्याचा मंत्र काय? मी झुकू शकत नाही, पराभव मान्य करू शकत नाही. मी देवाचा दास आहे. जितक्यांदा तुम्ही पडाल, तितक्याच त्वेषाने तुम्ही शक्तीशाली व्हाल, असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

5 / 6
प्रत्येकासमोर झुकावे का? - कुणालाही नाहक घाबरू नका. त्याच्यासमोर झुकू नका. कुणाच्या धमकीला भीक घालू नका. कोणीही कितीही मोठे असा, देवापेक्षा मोठे कोणीच नाही असे प्रेमानंद महाराज म्हणाले.

6 / 6
खरं प्रेम काय आहे?- कोणी प्रेम करत नाही. तो तितकाच व्यवहार असतो. तुम्ही गेल्यावर काही दिवस रडतील. मग ते त्यांच्या रहाटगाड्यात गुंततील. त्यामुळे देवाच्या नावाशिवाय, नामजपा शिवाय कोणीच तारू शकत नाही असे प्रेमानंद महाराज सांगतात.