कोणत्या आजारामुळे केस पांढरे होतात? ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

अगदी कमी वयात अनेकांचे केस पांढरे होण्यास सुरुवात होते. काही जण याकडे दुर्लक्ष करतात. पण जर तुमचे केस अगदी कमी वयात पांढरे होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

| Updated on: Jul 08, 2026 | 1:13 PM
1 / 8
कमी वयात केस पांढरे होणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकजण यामागे मानसिक ताण, खराब आहार-विहार किंवा अनुवांशिक कारणे असल्याचे मानतात. मात्र, काहीवेळा यामागे शरीरातील काही आरोग्य समस्या देखील कारणीभूत असू शकतात. जाणून घेऊया, कोणत्या आरोग्य समस्यांमुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात.

2 / 8
शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असल्यास केस कमकुवत होतात आणि वेळेपूर्वी पांढरे होण्याची शक्यता वाढते. यासोबत थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येणे ही लक्षणे देखील दिसू शकतात.

3 / 8
हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझममुळे केस गळणे आणि लवकर केस पांढरे होणे या दोन्ही समस्या उद्भवू शकतात. थायरॉइड हार्मोन्सचा असमतोल केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो.

4 / 8
रक्तात लोहाची (Iron) कमतरता असल्यास अॅनिमिया होतो. यामुळे केसांच्या मुळांना पुरेसा पोषण मिळत नाही, केस कमकुवत होतात आणि लवकर पांढरे होतात.

5 / 8
व्हिटिलिगो हा त्वचेचा आजार आहे, ज्यात त्वचेचा नैसर्गिक रंग हरवतो. जर हा आजार डोक्याच्या त्वचेवर (स्कॅल्प) झाला तर त्या भागातील केस देखील पांढरे होऊ शकतात.

6 / 8
सततचा तणाव केसांच्या रंगद्रव्यावर (Melanin) परिणाम करतो. यामुळे केस अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया वेगवान होते.

7 / 8
जर तुम्हाला कमी वयात अचानक मोठ्या प्रमाणात केस पांढरे होत असतील, केस जास्त गळत असतील किंवा यासोबत थकवा, अशक्तपणा, वजनात असामान्य बदल अशी लक्षणे दिसत असतील, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे एखाद्या अंतर्गत आरोग्य समस्यााचे लक्षण असू शकते.

8 / 8
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us