
गँगवॉरने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. येथील कोंढवा या परिसरात गणेश काळे या रिक्षाचालकाच भर दिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

पुण्यात भर पावसात तीन ते चार जणांनी गणेश काळे यांच्यावर धाडधाड गोळ्या घातल्या आहेत. गोळ्या घालून गणेश यांच्यावर पुन्हा कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत.

दरम्यान, रस्त्यावरच झालेल्या या हल्ल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर पावसाच्या पाण्यात सगळीकडे रक्त दिसत होते.

सोबतच घटनास्थळी काडतुसेही पडलेली होती. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जात सर्व पुरावे गोळा केले आहेत.

दरम्यान, आंदेकर टोळीच्या सदस्यांनीच हा खून केल्याचे बोलले जात आहे. गणेश काळेचा भाऊ समीर काळे वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणण्यात आले.