पुण्यातल्या बड्या उद्योगपतीचा बिहारमध्ये खून, ‘सायबर मर्डर’ने खळबळ!

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून झाला आहे.

| Updated on: Apr 16, 2025 | 9:34 PM
1 / 6
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून झाला आहे.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून झाला आहे.

2 / 6
पुण्यातल्या बड्या उद्योगपतीचा बिहारमध्ये खून, ‘सायबर मर्डर’ने खळबळ!

3 / 6
लक्ष्मण साधू शिंदे असं हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. लक्ष्मण शिंदे यांचे साडून विशाल लोखंडे यांनी या हत्येबाबत सांगितलं आहे. 'आम्ही फार दुःखात आहोत. लक्ष्मण शिंदे यांना बिहारमधून दहा तारखेला फोन आला होता. ज्याने फोन केला तो कास्टिंगचा व्यवसाय करत होता. कॉल इंडिया नावाच्या कंपनीचा जनरल मॅनेजर असल्याचं त्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं होतं, असं विशाल लोखंडे यांनी सांगितलं.

4 / 6
लक्ष्मण शिंदे यांची मुलगी अदिती शिंदे यांनीदेखील वडिलांच्या हत्येबाबत सांगितलंय. 'ते बोलले होते कोळशाच्या खाणीत जाणार आहे. जाताना त्यांना शंका आली होती चुकीचं काहीतरी घडू शकतं. डेबिट कार्डमधून त्यांनी 90 हजार रुपये काढून घेतले होते,' असं अदिती यांनी सांगितले.

5 / 6
crime news

crime news

6 / 6
लक्ष्मण शिंदे यांची पत्नी रत्नप्रभा शिंदे यांनीही नेमकं काय घडलं याबाबत सांगितलं. 'ते बाहेर गेल्यावर आम्हाला दर दहा-पंधरा मिनिटांना फोन करायचे. मात्र त्यांनी आमचा फोन उचलला नाही. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. ते बाहेर गेल्यावर आम्हाला नेहमी लाईव्ह लोकेशन टाकायचे,' अशी माहिती रत्नप्रभा शिंदे यांनी दिली.