
वेल डन बेबी हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

येत्या 9 एप्रिलला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. आज या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी केलं आहे. पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट कौटुंबिक आणि विविध भावनांच्या मिश्रणासोबतच या सिनेमाची कथा प्रत्येकाला आपलीशीही वाटेल.

अॅमेझॉन सादर करत असलेली ‘वेल डन बेबी’ ही एका खऱ्या कुटुंबावरून प्रेरित अशी हृदयस्पर्शी कथा आहे.

आधुनिक जगातील एक तरुण जोडपं (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात करतात. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी वेल डन बेबीची कथा अत्यंत गुंतवून ठेवणारी आहे आणि ही कथा नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार हे नक्की.

वेल डन बेबीची सुंदर कथा हृदयाला नक्की हात घालेल. ही मनोरंजक कथा तुम्हाला हसवेलही आणि प्रसंगी भावनिकही करेल.

या चित्रपटाची निर्मिती अभिनेता पुष्कर जोगनंच केलेली आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून अमृता आणि पुष्कर पहिल्यांदाच एका चित्रपटात झळकणार आहेत.

चित्रिकरणा दरम्यान कलाकारांनी प्रचंड धमाल केली आहे.

दोघींची ही ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांचं मन जिंकणार हे नक्की.