
फ्रिजवर मॅग्नेट लावल्याने वीज बिल जास्त येतं असं म्हणतात. सांगायचं झालं तर, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही पूर्णपणे अफवा आहे. फ्रिजच्या दारावर लावलेले मॅग्नेट फक्त सजावटीसाठी वापरले जातात.

याचा फ्रिजच्या कामावर कोणताही परिणाम होत नाही. तसेच या मॅगनेटचा फ्रिजच्या कूलिंग सिस्टमवर, मोटरवर किंवा वीज वापरावरही परिणाम होत नाही.

ईलेक्ट्रिकल तज्ज्ञ म्हणतात की फ्रिजचा वीज वापर अनेक तांत्रिक बाबींवर अवलंबून असतो. कंप्रेसर, थर्मोस्टॅट आणि दरवाजा सीलिंगसह, जे फ्रिजच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम करतात. जर फ्रिजचा दरवाजा योग्यरित्या बंद केला गेला नाही तर वीज बिल अधिक येऊ शकतं.

एवढंच नाही तर जर तुम्ही फ्रीज थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेवला तर वीज बिल देखील वाढू शकते. त्यामुळे घरातील थंड जागेवर फ्रीज ठेवल्याचा अधिक फायदा होऊ शकतो.

मॅगनेटचा प्रभाव फ्रिजच्या दरवाजाच्या बाहेरील पृष्ठभागापुरता मर्यादित असला तरी, त्याचा कोणत्याही फ्रिजच्या अंतर्गत यंत्रसामग्रीवर किंवा विजेच्या वापरावर कोणताही परिणाम होत नाही.. असं देखील समोर आलं आहे.