
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी आणि आक्रमक पद्धतीची भाषा सुरु आहे.

समोरासमोर आल्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी परस्पराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गटाकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न झाला.

संभाजीनगर क्रांती चौकात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. दुपारी 12 वाजता इथून चंद्रकांत खैरे यांची रॅली निघणार होती. त्याआधी महायुतीचे कार्यकर्ते इथे पोहोचले. त्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

"ज्या लोकांनी राम मंदिरावर टीका केली, त्या धर्माध लोकांना घेऊन रॅली काढली जात आहे. जय श्रीराम म्हणण्याची हिम्मत आहे का?" असं मनसेचे जिल्हाध्यक्ष म्हणाले.

"समोरासमोरची लढाई असेल, तर मनसे उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. ही औरंगजेबाची औलाद आहे. सकाळी यांनी रॅली काढायला सांगितली होती. पण हे मुद्दामून दुपारी आले" असा आरोप मनसे जिल्हाध्यक्षाने केला.