Rahul Gandhi India Alliance : भारत देश के तीन गद्दार… सगल तिसऱ्या दिवशी दिल्लीत वातावरण तापलं, राहुल गांधीच्या बसवरील पोस्टरनं वेधलं लक्ष
दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा इंडिया आघाडीने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत राजघाटावर दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी एका पोस्टरनं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने आज सलग तिसऱ्या दिवशीही आपला मोर्चा उघडला आहे. काल आणि परवा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.
दरम्यान, आज इंडिया आघाडी आणि काँग्रेसकडून राजघाटच्या दिशेने जाऊन प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राजघाटच्या दिशेने निघाले आहेत.
सत्ताधाऱ्याना बुद्धी दे, यासाठी प्राथना करणार, राजघाटावर आंदोलन करणार, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.
राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे एका बसमधून राजघाटच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी एका पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'भारत के तीन गद्दार, मोदी, शाह, ज्ञानेश कुमार' असं त्यावर लिहिलेलं आहे.
यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले आहेत. त्याचबरोबर मोठा पोलिसांचा फोजफाटाही दिसून येत आहे. पहिल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी जंतरमंतरवर आणि आज राजघाटाच्या दिशेने इंडिया आघाडीचे नेते निघाले आहे.