अजिबात नाही हटणार इथून, राहुल गांधी पोलीस ठाण्याबाहेर बसले आंदोलनाला

राहुल गांधी शुक्रवारी सकाळी दिल्लीतील 'संसद मार्ग' पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासोबत साहिल लोचब हे देखील होते, जो जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान 'पेलेट गन'च्या माऱ्यात जखमी झाला होता. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

| Updated on: Aug 21, 2026 | 2:07 PM
1 / 5
पेलेट गन चालवण्यात कथितरीत्या सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी राहुल गांधी तिथे गेले होते. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार, पोलीस साहिलची एफआयआर नोंदवण्यास नकार देत होते; त्यामुळे राहुल स्वतः त्याला घेऊन पोलीस ठाण्यात गेले.

2 / 5
आता राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याच्या आतच धरणे आंदोलन सुरू केले आहे. आता राहुल गांधी जखमी तरुणासोबत पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून बसले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
समोर येत असलेल्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी पॅलेट गनचा वापर करण्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याची माहिती घेण्यासाठीच राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात आले.

4 / 5
पोलिसांकडून पॅलेट गन कारवाईची कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. त्यामुळे नेमका तपास कुठपर्यंत आलाय हे कळायला मार्ग नसल्याने राहुल गांधी यांनी थेट पोलिस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

5 / 5
राहुल गांधी यांच्यासोबत पीडित तरुणही ठिय्या आंदोलन करत आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाहेरून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us