
दक्षिण रत्नागिरीत पुन्हा अवकाळी पाऊस तडाखा बसला आहे. पाचल गावात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. जिल्ह्यात अनेक भागात दुपारनंतर तापमानात वाढ आठवडाभर अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

सांगली जिल्ह्यातही तासगावमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. तासगावमधील बेदाणा शेडमध्ये अचानक सुरू झालेल्या वादळवारा आणि पाऊसामुळे बेदाणा सौदे थांबवावे लागले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी याची मोठी तारांबळ उडाली आहे.

या अवकाळी पावसामुळे भुईमूग, मटकी, कलिंगण, मुग अशा विविध प्रकारच्या शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आंबा पिकाचे ही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली.

दक्षिण रायगडमधील काही भागात महाड माणगाव गोरेगाव पोलारपुर सह विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली.