शेकडो मनसैनिकांसह अमित ठाकरे यांची जागर पदयात्रा; मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक
Mumbai Goa Highway MNS Jagar Padyatra : 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून मनसेच्या आक्रमक पवित्रा; आठ टप्प्यात पदयात्रेचं आयोजन. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने मनसेच्या जागर पदयात्रेचा समारोप होणार आहे.
1 / 5

मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागच्या 17 वर्षांपासून रखडलेलं आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे.
2 / 5

मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची पदयात्रा काढली आहे.
3 / 5

शेकडो मनसैनिक अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत चालत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर व्हावं, ही मनसैनिकांची मागणी आहे.
4 / 5

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्नी मार्गी लागावा, यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरलेत. सरकारनं जागं व्हावं आणि हे काम लवकरात लवकर सुरू करावं, अशी मागणी मनसैनिक करत आहेत.
5 / 5

आज सकाळी जागर पदयात्रेसाठी अमित ठाकरे मुंबईतून पळस्पेसाठी रवाना झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं. नवी मुंबईत वाशी टोलनाक्यावर फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us