मुंबईहून पुण्याला जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, मालगाडीत तांत्रिक समस्येने घोळ
मुंबईहून पुण्याला जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे मार्गावर ट्रेनला याचा फटका बसला आहे.

pune to mumमुंबईहुन पुण्याला जाणारी रेल्वे वाहतूक गेल्या अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. मळवली रेल्वे स्टेशनजवळ मुंबईहून कंटेनर घेऊन येणाऱ्या मालगाडी समोर अचानक एक माणूस आल्याने रेल्वे चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावल्याने तांत्रिक बिघाडाने पुण्याकडे येणारा रेल्वे मार्ग बंद झाला आहे. bai train stop
मालगाडीला इमर्जन्सी ब्रेक लावल्याने प्रेशर तयार करण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वे विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून अर्ध्या तासात रेल्वे सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
पनवेल-नांदेड एक्सप्रेस,पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस,डेक्कन क्वीन ह्या रेल्वे गाड्यांना या बिघाडाचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे मुंबईहून पुण्याला अर्जंट कामाला जाणाऱ्या लोकांचे प्लान विस्कळीत झाले आहेत.

मुंबई ते पुणे दररोज अनेक कर्मचारी नोकरीसाठी येजा करत असतात, त्यांना देखील या तांत्रिक बिघाडाचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे.