Kapoor Family Education : एकाने कॉलेज सोडलं, दुसरा फक्त 10वी पास.. कपूर कुटुंबियांमध्य सर्वात जास्त शिक्षण कोणाचं ?

Kapoor Family Educational Qualification : भारतीय चित्रपटसृष्टीत कपूर कुटुंबाचा मोठा दबदबा आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते करीना (Kareena Kapoor) , करिश्मा (Karishma Kapoor) , रणबीर (Ranbir Kapoor)पर्यंत कपूर कुटुंबाचा हा वारसा चालत आला असून काहून एक असे उत्तम कलाकार, अभिनेते, या कुटुंबाने बॉलिवूडला दिले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून कपूर कुटुंब सर्वांचं मनोरंजन करत आलं आहे. या कुटुंबातील सदस्यांपैकी सर्वात जास्त शिकलेलं कोण, कमी शिक्षण कोणाचं झालं ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 30, 2025 | 4:27 PM
1 / 8
राज कपूर यांनी फक्त इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

2 / 8
प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांचे शिक्षणही जास्त नव्हते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को विद्यापीठातून पूर्ण केलं. .

3 / 8
अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून आपले इंटरमीडिएट शिक्षण पूर्ण केले.

4 / 8
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर अजमेरच्या मेयो कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

5 / 8
नामवंत अभिनेत्री असलेल्या करीनाच्या अभिनयाचं नाणं अगदी खणखणीत आहे. मात्र तिचं शिक्षण फार झालेलं नाही. करीना कपूर ही कॉलेज ड्रॉपआऊट आहे. तिने बी.कॉम पदवी मिळविण्यासाठी मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दोन वर्षांनी, तिने कॉलेज सोडले आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

6 / 8
विख्यात अभिनेत्री करिश्मा कपूरने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, त्यानंतर ती शिक्षणाकडे परत वळलीच नाही.

7 / 8
Kapoor Family Education :  एकाने कॉलेज सोडलं, दुसरा फक्त 10वी पास.. कपूर कुटुंबियांमध्य सर्वात जास्त शिक्षण कोणाचं ?

8 / 8
आजच्या काळातील आघाडीचा अभिनेता, चॉकलेट बॉय रणबीर कपूरने देखील फक्त 10 दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तो न्यू यॉर्कला गेला आणि त्याने तिथे अभिनयाचे शिक्षण घेतले.