आधी बंधू भेट, नंतर भवानीमातेचं दर्शन अन् मग..; तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात, काय काय घडलं?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संयुक्त वचननामा प्रकाशित केला. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनी शिवसेना भवनात दाखल झाले होते.

| Updated on: Jan 04, 2026 | 3:28 PM
1 / 5
तब्बल 20 वर्षांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झाले होते. मुंबई महानगरपालिकेसाठी संयुक्त वचननामा जाहीर करण्यासाठी ते याठिकाणी पोहोचले होते. शिवशक्तीचा वचननामा, असं त्याला म्हटलं गेलं होतं.

2 / 5
शिवसेना भवनात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वांत आधी उद्धव ठाकरेंसोबत तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. भवानी मातेसमोर वचननाम्याची एक प्रत ठेवण्यात आली. देवीसमोर ठाकरे बंधू नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी फोटोसाठी माध्यमांसमोर एकत्र पोझ दिले.

3 / 5
सभागृहात सर्वांत आधी संजय राऊतांनी माध्यमांना संबोधित केलं. "जवळपास सर्वच पत्रकारांना त्यांना विचारलं की, 20 वर्षांनी शिवसेना भवनात आलात, कसं वाटतंय? महाराष्ट्रालाच बरं वाटतंय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं म्हणजे आजही हिंदू Undivided फॅमिली काय आहे, याचं चित्र आहे", असं राऊत म्हणाले.

4 / 5
राज आणि उद्धव एकत्र आल्यापासून सर्वकाही संयुक्त होतंय. संयुक्त सभा, संयुक्त पत्रकार परिषद, संयुक्त मुलाखत आणि संयुक्त वचननामा.. आज शिवशक्ती म्हणजे महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख पक्षांची आघाडीचा संयुक्त वचननामा आज प्रकाशित होतोय, असं संजय राऊत पुढे म्हणाले.

5 / 5
"माझे मित्र संजय राऊत यांनी वारंवार उल्लेख केली की, वीस वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात आले. मला खरं तर वीस वर्षांनंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. वीस वर्षे जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आले आहेत, आपण त्यांचं स्वागत करुयात, असं वाटतंय," अशी मिश्कील टिप्पणी राज ठाकरेंनी केली.