AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात हाहाकार, डाळ मिळत नाही म्हणून…गंभीर संकट आल्याने शाहबाज यांची झोप उडाली!

पाकिस्तान हा देश नेहमीच कशाच्यातरी संकटात सापडतो. आता या देशापुढे नवे आणि गंभीर संकट निर्माण झाले आहे. येथील नागरिक डाळीसाठी तरसत आहेत.

पाकिस्तानात हाहाकार, डाळ मिळत नाही म्हणून...गंभीर संकट आल्याने शाहबाज यांची झोप उडाली!
pakistan pulsesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 6:24 PM
Share

Pakistan Pulses Crisis : पाकिस्तान हा असा देश आहे जो नेमहीच आर्थिक विवंचनेतून जातो. या देशाला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तर हा देश नेहमीच पैसे मागतो. या देशात कधी गव्हाचे दुर्भिक्ष्य पाहायला मिळते. तर कधी पाण्याची टंचाई झालेली पाहायला मिळते. असे असतानाच आता या देशावर एक मोठे संकट आले आहे. या देशात डाळीचं मोठं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.

1998 सालानंतर डाळीचे अत्पादन घटत गेले

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात दिवसेंदिवस डाळींच्या उत्पादनात घट होत आहे. बहुसंख्य डाळ परदेशातून आयात केली जाते. आकड्यांत सांगायचे झाल्यास पाकिस्तान प्रत्येक वर्षी साधारण 98 कोटी डॉलरची डाळ आयात करतो. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या रिपोर्टनुसार कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी पाकिस्तानातील या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात पाकिस्तानात डाळींचे उत्पादन न वाढल्यास मोठे संकट उभे राहू शकते. पंजाब पल्सेस इम्पर्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष आणि ग्रेन मार्केटचे चेअरमन राणा मुहम्मद तैयब यांनी सांगितल्यानुसार 1998 सालाच्या अगोदर पाकिस्तान जगातील प्रमुख डाळ निर्यात करणारा देश होता. नंतरच्या काळात परवेज मुशर्रफ यांच्या सरकारने डाळीवरील निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर डाळीच्या उत्पादनामुळे तोटा होऊ ळागला. परिणामी हळूहळू डाळींच्या उत्पादनात घट झाली.

10.7 लाख टन डाळ करावी लागते आयात

पाकिस्तानात दरवर्षी 16.2 लाख टन डाळ लागते. यातील साधारण 10.7 लाख टन डाळ आयात केली जाते. म्हणजेच पाकिस्तानला साधारण 80 टक्के डाळ आयात करावी लागते. पाकिस्तानातील AARI चे पल्सेज सेक्सनचे मुख्य सहाय्यक खालीद हुसैन यांच्या मतानुसार डाळ ही मानवी पोषणासाठी तसेच मातीची पौष्टीकता कायम राहावी यासाठी फार गरजेची आहे. परंतु मर्यादीत नफा आणि निर्यातीवर बंदी असल्याने शेतकरी डाळीचे उत्पादनच घेत नाहीयेत. त्यामुळे आता परिस्थिती कठीण झाली आहे. दरम्यान, आता पाकिस्तान या संकटातून कसा मार्ग काढणार, भविष्यात पाकिस्तान डाळ निर्यातीवरील बंदी हटवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन